You are currently viewing स्वातंत्रवीर विनायक सावरकर यांच्या जयंतीनिमित्त २८ मे ला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

स्वातंत्रवीर विनायक सावरकर यांच्या जयंतीनिमित्त २८ मे ला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

सावंतवाडी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त कळसुलकर इंग्लिश स्कूल आयोजित आणि स्वा सावरकर नागरी सहकारी पतसंस्था प्रायोजित स्वा सावरकर जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार 28 मे रोजी कळसुलकर इंग्लिश स्कूल येथे ही स्पर्धा होणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा चार गटात होणार आहे पहिली ते चौथी स्वा सावरकर यांच्या जीवनावर आधारित एक कथा, पाचवी ते आठवी कारागृहातील स्वा सावरकर, नववी ते बारावी स्वा सावरकरांचा राष्ट्रवाद, खुला गट स्वा सावरकर यांच्या विचारांची आजची गरज हे स्पर्धेचे विषय आहेत या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत इच्छुक स्पर्धकांनी मंगळवार 24 मेपर्यंत आपली नावनोंदणी करावी यासाठी वरक सर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र अशा स्वरुपात पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + eighteen =