You are currently viewing कणकवली मतदारसंघातील सर्व सरपंचाचा विमा उतरवणार…

कणकवली मतदारसंघातील सर्व सरपंचाचा विमा उतरवणार…

३ लाखाचा विमा संरक्षण देण्याचे आ. नितेश राणे यांचे आश्वासन..

कणकवली :

कणकवली मतदारसंघातील आ. नीतेश राणे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राणे यांनी “कणकवली मतदारसंघांतील मतदारांनी मला निवडून दिलंय. त्या सर्वांचं मी प्रतिनिधित्व करतोय. त्यामुळे मतदारसंघातील सर्व सरपंचाचा विमा उतरवणार” असे आश्वासन दिले.

 

हा विमा ३ लाखाचा असणार आहे. तसेच कालावधी एक वर्षासाठी असणार आहे. या विम्याला ३ लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या सरपंचांचा ३ लाखाचा खर्च झाला असेल. त्यांना आणखी ७५ हजार रुपये वाढवून मिळणार आहे. कोरोना काळात सरपंच मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. ही जबाबदारी पार पाडत असताना अनेक सरपंचांचा मृत्यूही झाला आहे. परंतु शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मात्र लोकप्रतिनिधी या नात्याने मी सरपंचांची जबाबदारी घेत असून पक्षभेद न पाहता सर्वच सरपंचांचा विमा मी उतरवणार असे आश्वासन नितेश राणे यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा