You are currently viewing कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात सदिच्छा समारंभ संपन्न

कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात सदिच्छा समारंभ संपन्न

वैभववाडी

कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी येथे १२ वी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्री जयेंद्र रावराणे स्थानिक कमिटी अध्यक्ष हे होते. कियाना अकॅडमीचे प्रमुख श्री अजय कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यानी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

आयुष्यामध्ये ध्येय असणे किती गरजेचे आहे हे रावराणे साहेबांनी मुलांना पटवून दिले. अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नादकर बी.एस होते. या कार्यक्रमाप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. महाविद्यालय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या १२ वी बोर्ड परीक्षेला आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला महाविद्यालयीन शिक्षक व माध्यमिक शिक्षक आणि १२ वी विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री मरळकर सर यांनी तर आभार श्री सारंग सर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 18 =