You are currently viewing बांदा केंद्र शाळेच्या सेल्फी विथ ट्री उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

बांदा केंद्र शाळेच्या सेल्फी विथ ट्री उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

बांदा

जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आपल्या घराजवळ झाडाच्या रोपांची लागवड करून त्यासोबत सेल्फी फोटो काढून तो सोशल मीडियावर प्रसारित करून पर्यावरण दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मध्ये पर्यावरण विषयक जाणीवजागृती व्हावी यासाठी शाळेचे स्काऊटर शिक्षक श्री जे. डी. पाटील यांनी व्हाॅटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परिसरात यापूर्वी एखादे झाड लावून ते जगवले असल्यास किंवा या दिवशी एखादे नवीन झाडाचे रोप लावून त्याच्या सोबतचा एक सेल्फी फोटो पाठवायचे आवाहन केले होते. या उपक्रमाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी हा पर्यावरण दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला.
पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत असलेले तापमान ,कमी होणारे प्रर्जन्यमान,तसेच जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू या सर्व समस्यांवर वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे यासाठी या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये वृक्षसंवर्धनाचा अनोखा संदेश बिंबवण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी मुख्याध्यापिका सरोज नाईक ,उर्मिला मौर्ये, रसिका मालवणकर, रंगनाथ परब, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, जागृती धुरी ,प्राजक्ता पाटील तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा