शासनाच्या नियमानुसार असणाऱ्या सोयी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपलब्ध करा

शासनाच्या नियमानुसार असणाऱ्या सोयी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपलब्ध करा

शहर महिला मोर्चाच्या वतीने मागणी

सावंतवाडी

शासनाच्या नियमानुसार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ज्या सोयी उपलब्ध नाही आहेत. त्या सोयी तातडीने उपलब्ध करण्यात याव्यात अशी मागणी सावंतवाडी शहर महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षा मोहीनी मडगांवकर, नेत्रा मूळ्ये, प्रियांका नाईक, बांदा शहर अध्यक्ष अवंती पंडित, मेघना साळगांवकर, मिसबा शेख, निर्मला यादव, प्राजक्ता मुद्राळे, सुकन्या टोपले आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत १० बालकांचा गुदमरून दूर्दैवी मृत्यू झाला होता. जगात पाऊल टाकण्याआधीच जग सोडण्याची वेळ या चिमुकल्यांवर आली हे अत्यंत दुर्दैवी आहे. या संवेदनशील विषयाला वाचा फोडण्यासाठी भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातून आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालय, प्रसतीगृह व बालरुग्णालय येथे भेट देवून सर्व सोयींची माहिती घेतली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा