You are currently viewing अभिनेते भाऊ कदम यांची कणकवली न.पं. च्या कोविड केअर सेंटरला भेट

अभिनेते भाऊ कदम यांची कणकवली न.पं. च्या कोविड केअर सेंटरला भेट

नगराध्यक्ष नलावडे यांच्या कामाचे केले कौतुक

कणकवली

हास्यसम्राट, अभिनेते भाऊ कदम यांनी कणकवली नगरपंचायतच्या कामाचे कौतुक केले.कणकवली नगरपंचायतच्या कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. राज्यभरात कोरोना ने अक्षरशः धुमाकूळ मांडलेला असताना मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोविड रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाही. अशा स्थितीत माझ्या गावात कणकवली नगरपंचायत ने कोविड रुग्णांची काळजी घेण्यासाठी चांगल्या दर्जाची सुविधा निर्माण केल्याचं मला समजलं.

“ह्या माझाच गाव, माका समाजला आणि मी इलय” अशा अस्सल मालवणीत हास्यसम्राट अभिनेते भाऊ कदम यांनी संवाद साधला. माझे मित्र नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कोविड रुग्णांसाठी केलेल्या सुविधांची माहिती मिळाली म्हणून हे सर्व बघायला आलो. खरोखरच सुंदर नियोजनबद्ध सुविधा येथे देण्यात आल्या. असे गौरवोद्गार भाऊ कदम यांनी काढले. कणकवली नगरपंचायतच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुडेश्वर मैदान येथील कोविड केअर सेंटर व भगवती मंगल कार्यालय येथे होत असलेल्या 100 बेडच्या विलगीकरण केंद्राची पाहणी कॉमेडी किंग भाऊ कदम यांनी केली.

यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेवक रवींद्र गायकवाड, ऍड. विराज भोसले, गटनेते संजय कामतेकर, मेघा गांगण, कविता राणे, प्रतिक्षा सावंत, महेश सावंत , किशोर राणे, सिद्धेश महाजन, बंडू गांगण, राजू गवाणकर, अण्णा कोदे आदी उपस्थित होते. कणकवली नगरपंचायतच्या कोविड केअर सेंटरची पाहणी व कणकवली नगरपंचायतच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या विलगीकरण केंद्राच्या पाहणीनंतर कॉमेडी किंग भाऊ कदम यांनी कणकवली नगरपंचायतच्या या कामाचे कौतुक केले. नगरपंचायतीने कोरोना रुग्णांची काळजी घेण्यासाठी खरोखरच नियोजनबद्ध उपाययोजना केल्या आहेत. अगदी येथे दाखल झालेल्या रुग्णांना आपल्या नातेवाईकांशी देखील संपर्क साधण्यासाठी सुविधा दिली.

मनोरंजनाची साधने उपलब्ध केली. नगरपंचायतची ही कोविड सेंटर अनेकांसाठी आदर्शवत अशी आहेत असे गौरवोद्गार भाऊ कदम यांनी काढले. तसेच कणकवली नगरपंचायतला अजून कोविड सेंटर जर उभारायचे असेल व माझी मदत लागली तर त्यांना मदत करण्यास मी तयार आहे अशी ग्वाही देखील कदम यांनी याप्रसंगी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा