You are currently viewing खतांच्या बॅगांवर पंतप्रधानांचे फोटो; हा आचारसंहितेचा भंग नाही का ?*

खतांच्या बॅगांवर पंतप्रधानांचे फोटो; हा आचारसंहितेचा भंग नाही का ?*

 

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुका जाहीर झाल्यापासून ते निकालापर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून भिंतींवर पक्षाचे चिन्ह रंगवून ठेवण्यात आले आहे. तसेच खतांच्या बॅगांवर पंतप्रधानांचे फोटो दिसून येत आहे. हा आचारसंहितेचा भंग नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे.

 

केंद्र सरकार स्वतःची जाहिरात करण्यासाठी एवढं पुढे गेलं की, खतांच्या बॅगा आणि शहराच्या भिंती रंगून ठेवल्या आहेत. निवडणूक आयोगाने तातडीने आचारसंहितेचा भंग होते त्या ठिकाणी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

रोहिणी खडसे म्हणाल्या की, आपण पाहिले तर आजूबाजूच्या परिसरात भिंतीवर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या पक्षाचे चिन्ह भिंतीवर रंगवले आहेत. तसेच खतांच्या बॅगांवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दिसून येत आहे. मी एका खत विक्रेत्याच्या दुकानात गेले असता त्या खत विक्रेत्यांना अशी चिंता आहे की, आता आचारसंहिता सुरु आहे. पंतप्रधान मोदींच्या फोटोला झाकायचे कसे? फोटो झाकला नाही तर आचारसंहितेचा भंग होणार. म्हणजे स्वतःची जाहिरात करण्यासाठी केंद्र सरकार एवढे पुढे गेलेले आहे की, खतं सोडली नाहीत, भिंती सोडल्या नाहीत, त्यांनी ठिकठिकाणी सरकारचा पैसा वापरून जाहिराती केलेल्या आहेत. हा नागरिकांचा पैसा आहे. या जाहिराती म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे. यावर निवडणूक आयोगाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी यावेळी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा