You are currently viewing सर्वेश पावसकर व त्याचा सहकार्यची परराज्यातून आलेल्या भुकेलेल्या माणसाला मदत

सर्वेश पावसकर व त्याचा सहकार्यची परराज्यातून आलेल्या भुकेलेल्या माणसाला मदत

 

काल रात्री राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कुडाळ-मालवण विधानसभा अध्यक्ष सर्वेश पावसकर यांना कुडाळ येथील हायवे लगत असलेले नवीन बस डेपो च्या वरील ब्रिज च्या रस्त्याच्या बाजूला एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत दिसला. त्यांनी त्यास पाणी देऊन शुद्धीवर आणले व त्याची विचारपूस केली. सदर विचारले असतात तो माणूस हैदराबाद येथील असल्याचे त्यांनी सांगितले. व आपण अनेक मैल चालल्या मुळे आपण भुकेलेले आहोत. हे ऐकल्यावर लागलीच पावसकर हे आपल्या घरी जाऊन जेवण घेऊन आले व त्याला दिले तसेच त्याच्या तब्येतीबद्दल चौकशी केली व बरे नसल्यास डॉक्टर कडे घेऊन जाऊ असे सांगितले. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाचा काळात पावसकर यांनी  त्याला केलेली मदत ही त्या माणसास मौल्यवान वाटली त्यांनी पावसकर व त्यांच्या सोबत  असलेल्या मित्रमंडळींचे आभार मानले. या यावेळी पावसकर यांनी अश्या भुकेलेल्या  माणूस कोठेही आपल्या निदर्शनास आल्यास आपल्यास संपर्क  करावा आम्ही गरजूस मदत करू असे त्यानीं सांगीतले.

यावेळी राष्ट्रवादी युवक कांग्रेस कुडाळ-मालवण विधानसभा अध्यक्ष सर्वेश पावसकर,अक्षय पावसकर, महेंद्र पावसकर  व अन्य सहकारी मित्रमंडळी तिथे होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा