You are currently viewing यशामध्ये सातत्य टिकवून ठेवा! –  सौ श्रुती गोगटे

यशामध्ये सातत्य टिकवून ठेवा! – सौ श्रुती गोगटे

हडी जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने गुणवंतांचा गौरव

मालवण

हडी जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने राबविण्यात आलेला गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम अनुकरणीय आहे. विद्यार्थ्यानी आपल्या यशामध्ये सातत्य टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. मिळालेल्या यशाने हुरळुन न जाता जेष्ठांचा आदर करायला शिकणे महत्वाचे आहे. जिवनात वाचनाला अतिशय महत्व आहे. सध्याच्या ऑनलाईन शिक्षणाच्या युगात मोबाईलचा वापर अभ्यासासाठीच करा. असे आवाहन हडी शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याद्यापीका सौ श्रुती गोगटे यानी येथे केले.

फेस्कोन संलग्न जेष्ठ नागरीक सेवा संघ हडीच्या वतीने गावातील दहावी, बारावी, पदवीधर व स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार हडी जठारवाडी शाळा नंबर २ येथे नुकताच करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचा शुभारंभ साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाला. यावेळी संघाच्या अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले, उपाध्यक्ष रमेश कावले, माजी सभापती उदय परब, सचिव प्रभाकर चिंदरकर, सुरेश भोजने, पोलीस पाटील शितल परब, पुजा तोंडवळकर, सोनाली कदम, सौ रीया पाटकर, उमेश हडकर, दीलीप करंदीकर, माजी सचिव तथा सल्लागार चंद्रकांत पाटकर, सोनाली कदम, दिनेश सुर्वे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी सुरेश भोजने यांच्या वतीने दहावी मधुन प्रथम तीन क्रमांकाने उतिर्ण झालेल्या विद्यार्थ्याना दहा हजार रकमेची पारीतोषीके देण्यात आली. यावेळी बोलताना उदय परब म्हणाले, यशाचा पाठलाग करा. जिवनात जिद्द, चिकाटी कायम ठेवा. हडी जेष्ठ नागरीक संघाने यापुढेही आपल्यातील एकोपा कायम ठेवून अशाच प्रकारचे उपक्रम यापुढेही राबवावेत. विद्यार्थ्यानी चांगला अभ्यास करुन जिवनात यश मिळवावे व मोठे झाल्यावर आपल्या शाळेला, गावाला कधीही विसरु नये असे आवाहन विद्यार्थ्याना केले. संघाच्या अध्यक्ष चंद्रकला कावले यानी जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने आयोजीत विविध उपक्रमांची माहीती दिली. यावेळी गावातील पन्नास विद्यार्थ्याना संघाच्या वतीने शैक्षणिक साहीत्य देण्यात आले. यावेळी उपसचिव प्रभाकर तोंडवळकर, कोषाध्यक्ष सौ प्रज्ञा तोंडवळकर, सदस्य मंजिरी पेडणेकर, गितांजली मयेकर, सौ मनिषा पोयरेकर, शंकर पाटील, गणेश परब, मोहन घाडीगावकर, मेघ:शाम नारिंग्रेकर,गणु परब, रमाकांत सुर्वे, दिनकर सुर्वे, शांताराम साळकर, बाबु मेस्त्री, कृष्णा धुरी, गुरुनाथ गावकर, रीया पाटकर, सुभाष वेंगुर्लेकर, सौ सीमा शेटये, वैशाली पाटकर, सुभाष वेंगुर्लेकर आदिंसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्तावीक व आभार चंद्रकांत पाटकर यानी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =