You are currently viewing साटेली-भेडशी बाजारपेठ ५ जून पासून १० दिवस कडकडीत बंद…सरपंच लखु खरवत

साटेली-भेडशी बाजारपेठ ५ जून पासून १० दिवस कडकडीत बंद…सरपंच लखु खरवत

पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन…

दोडामार्ग

कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी साटेली-भेडशी बाजारपेठ ५ जून पासून १० दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्राम नियंत्रण समितीने घेतला आहे.यावेळी अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व दुकाने या काळात बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान बाजारपेठ बंदला साटेली-भेडशी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहकार्य करावे,असे आवाहन सरपंच लखु खरवत यांनी केले आहे.
ग्रामपंचायत साटेली-भेडशी कार्यक्षेत्रात १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत १२९ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले आहेत.त्यापैकी ६९ व्यक्ती बरे झाले,तर ५ व्यक्ती मयत झाल्या आहेत.सध्या ५५ जण उपचार घेत आहेत. त्यामुळे ५ ते १५ जून या काळात बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या नियंत्रण आणावी यासाठी ३१ मे रोजी ग्रामस्तरीय नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये बाजारपेठ बंद बाबत सर्वानुमते ठराव व निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस अधिकारी यांनीही बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असेही आवाहन श्री खरवत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 9 =