You are currently viewing भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सौ उमाताई खापरे यांचा सिंधुदुर्ग दौरा…..

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सौ उमाताई खापरे यांचा सिंधुदुर्ग दौरा…..

कुडाळ

भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा सौ उमाताई खापरे शनिवार दिनांक ७/११/२०२० रोजी सिंधुदुर्ग येथे येत आहेत. कुडाळ येथील मराठा समाज हॉल मधे जिल्हा कार्यकारिणी बैठकीत महिला मोर्चा जिल्हा पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देणे व महिला मार्गदर्शन असा नियोजित कार्यक्रम आहे यावेळी त्यांच्यासोबत मा. सौ अश्विनी जिजकर प्रदेश सरचिटणीस, मा सौ निलम गोंधळी प्रदेश उपाध्यक्षा तसेच कोकण विभाग प्रमुख उपस्थिती रहाणार आहेत.
त्याच प्रमाणे मा. प्रदेश अध्यक्षा सौ उमाताई खापरे महिलांच्या विविध विषयांवर आधारित पत्रकार परिषद दिनांक 07/11/2020 रोजी कुडाळ मराठा समाज हॉल येथे दुपारी 2:00 घेणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचेे आवाहन अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा, सिंधुदुर्ग सौ. संध्या तेरसे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 − one =