You are currently viewing जिल्ह्यातील सरपंचांना आता लसीकरणात प्राधान्य; सरपंचाना आता मिळणार कोरोना लस

जिल्ह्यातील सरपंचांना आता लसीकरणात प्राधान्य; सरपंचाना आता मिळणार कोरोना लस

शिक्षण-आरोग्य सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी यांच्या पाठपुराव्याला यश…

दोडामार्ग

जिल्ह्यातील पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे.त्याचप्रमाणे आता जिल्ह्यातील सरपंचांनाही कोरोना लसीकरणास प्राधान्य देण्यात येणार असून याबाबत सीईओ प्रजित नायर यांच्याशी चर्चा केली असून त्यांच्याही लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी यांनी दिली आहे. .
कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावातील सरपंच फ्रंट वर्कर्स प्रमाणे काम करत आहेत.त्यांच्याही जीवाला धोका होऊ शकतो.त्यांना लसीकरण कधी होणार असा सवाल सरपंच संघटनेकडून उपस्थित केला जात होता.याबाबत सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी यांनी याबाबत आपण याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याशी चर्चा केली असून प्रत्येक गावातील सरपंचाना लसीकरण करण्याचा निर्णय झाला आहे.ज्याप्रमाणे जिल्ह्यातील पत्रकारांना लसीकरण करण्यात येत आहे त्याच धर्तीवर सरपंचांनाही कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे.या निर्णयामुळे सरपंचांना आता काम करण्यास आणखी उत्साह येणार असून त्यांच्या जीवाचा धोकाही कमी होणार असल्याचे डॉ.सौ.दळवी यांनी स्पष्ट केले. .

प्रतिक्रिया व्यक्त करा