You are currently viewing कारच्या धडकेत वेत्ये येथे दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू…

कारच्या धडकेत वेत्ये येथे दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू…

सावंतवाडी

कारची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक वृद्ध जागीच ठार झाले. हा अपघात आज दुपारच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर वेत्ये इंन्सुली तिठा येथे घडला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, गुरुनाथ राजाराम प्रभू-झांट्ये (८५) रा.आजगाव, असे त्यांचे नाव आहे. ते आपल्या मुलाकडे इन्सुली येथे जात होते. यावेळी हा अपघात घडला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − eight =