You are currently viewing विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचारी, अधिकाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचारी, अधिकाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

कणकवली

बीएसएनएल च्या देशभरातील कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने बीएसएनएलची 4g सेवा तात्काळ सुरू करून 5g सेवेची तयारी सुरू करा, बीएसएनएल ग्राहकांना वेगवान सेवे सोबतच बीएसएनएलचे नेटवर्क मजबूत करा, कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत द्या, बीएसएनएल चे डी ओ टी कडे असलेले 39 हजार कोटी परत करा, बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तीसरा वेतन करार त्वरित सुरू करा, थेट भरती कर्मचार्‍यांना त्वरित 30 टक्के एस ए बी लागू करा, बी एस एन एल चे टॉवर व फायबर जाळी विकू नका, एफ टी टी एच च्या सेवेच्या दर्जात सुधारणा करा, कुचकामी ठरलेल्या ठेकेदारांचा पुनर्विचार करा, लँड मॉनिटायझेशन नुसार बीएसएनएल ला कर्जमुक्त करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

सिंधुदुर्ग मध्ये बीएसएनएलच्या कर्मचाऱ्याची संख्या खूपच कमी आहे. तरी सुद्धा त्यांनी निदर्शने करून आपला निषेध नोंदविला. या लाक्षणिक उपोषणात गणेश वाघाटे, संतोष राणे, शेखर म्हापणकर, गजानन राऊळ, उमेश हजारे, संजय नाईक, संतोष मयेकर आदी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =