You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुगाराचा बादशाह का झाला जेरबंद..?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुगाराचा बादशाह का झाला जेरबंद..?

पिंजर्‍यात वाघाची सुद्धा शेळी… व्हिडीओ झाला व्हायरल…….

गोव्यातील चोरट्या दारूचा व्यवसाय करणारा आणि जिल्ह्यातील जुगाराचा बेताज बादशाह समजला जाणारा कसलाही शोर न करणाऱ्या दात पडक्या आप्पाला जुगार आणि दारूच्या अवैध व्यवसायाबरोबरच बाईचा देखील नाद असल्याचं समोर आलंय. त्यामुळे अवैध व्यवसायातून आलेल्या पैशांच्या जोरावर आप्पा लिंगपिसाट झाल्याचे दिसून येतं.
बाईशी लगट करण्याची जणू काय नामी संधीच आप्पाला चालून आली. जुगाराच्या बैठकीला आलेला एक जुगारी.,… याचा मोबाईल बंद पडल्याने मोठ्या विश्वासाने त्याने दात पडक्या आप्पाच्या मोबाईल वरून आपल्या पत्नीला फोन लावला. त्याला काय माहिती होतं, आप्पा हीच संधी साधून आपल्याच पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात ओढेल. त्यानंतर आप्पाने ओळख वाढविली. मोबाईल वरून मेसेज करू लागला, प्रेमाच्या बतावण्या सुरू झाल्या….आप्पा पैशांच्या जोरावर बाईला जाळ्यात ओढू लागला.
आप्पाचा अंदाज चुकला, पैशांच्या जोरावर आणि प्रेमाच्या फंदात पतिव्रता पडत नसतात याचा प्रत्ययच दात पडक्या आप्पाला आला. बाईने घडला प्रकार आपल्या नवऱ्याच्या कानावर घातला. दोघांनीही प्लॅन करून बाईने आप्पाला आपल्या घरी बोलावले. आप्पाच्या मनात दोन लाडू फुटले. मोठ्या आशेने आप्पा तिच्या घरी पोचला. बाईने शिताफीने आप्पाला खोलीत गेले आणि खोलीत जेरबंद केले. बंद खोलीतून बाहेर पडण्यासाठी नंतर आप्पाची धडपड सुरू झाली. पिंजऱ्यात तर वाघाची सुद्धा शेळी होते तशीच गत जुगार आणि दारूच्या धंद्यातील बेताज बादशहाची झाली. आप्पाचा बंद खोलीतून बाहेर पडण्यासाठीच्या केविलवाण्या परिस्थितीतील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. आप्पाने दळवी नावाच्या व्यक्तीला आपली सुटका करण्यासाठी बोलावले. दळवींच्या मध्यस्तीने दोघांमध्ये माफीनामा लिहून घेत तह झाला माफीनाम्यावर शेवटी आप्पाची सुटका झाली, परंतु ज्याने त्याने आपला धंदा करावा नको ते धंदे गोत्यात आणतात याचा प्रत्यय याही डोळी दात पडक्या आप्पाला आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =