कणकवली तालुका शिवसेना नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने होणार

कणकवली तालुका शिवसेना नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने होणार

आ.वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न.

कणकवली :

कणकवली तालुका शिवसेना नवरात्रोत्सवाच्या नियोजनाची बैठक आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शाखेत आज संपन्न झाली. कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पध्दतीने नवरात्रोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले.तसेच या कालावधीत आरोग्य विषयक उपक्रम राबविण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.

१७ ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. कोरोनाचे संकट कायम असल्याने शिवसेनेच्या वतीने साजरा केला जाणार नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. या नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी शेखर राणे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.तर राजू राणे यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, राजू राणे, शेखर राणे, अनिल हळदीवे, प्रमोद मसुरकर, दामू सावंत, राजन म्हाडगुत, सुनील पारकर, बंडू ठाकूर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा