रक्तशुध्दीकरणासाठी प्रभावी गोकर्ण वनस्पती विषमुक्तीचे साधन
रक्तशुध्दीकरणासाठी प्रभावी गोकर्ण वनस्पती विषमुक्तीचे साधन

रक्तशुध्दीकरणासाठी प्रभावी गोकर्ण वनस्पती विषमुक्तीचे साधन

भगवान शंकराचे आवडते फूल म्हणून गोकर्णी वेलीचे फुल आपणा सर्वास परिचित असेलच.हे शंकरास हे फूल आवडले ते का उगीच नव्हे. याची फूले, गायीच्या कानासारखी, शंखाकृती असतात तर पाने गोलाकार हिरव्या मेथीसारखी असतात. याच्यातील दिव्य औषधी गुणधर्नामुळे व स्वरुपामूळे ती शंकरास प्रीय झाली. मानवी शरिरातील विष उतरविण्याची अफाट शक्ती या शंकररूपी वनस्पतीत आहे.साप चावल्यानंतर चावल्या जागेवर ती लावल्यास सापाचे विष शरिरातून बाहेर पडते हे वाचून आश्चर्य वाटायला नकोय.दिव्य व अद्भूत शक्ती विधात्याने या वनस्पतीत साठवून ठेवली आहे. पुर्वजांनी या अनेक आजारावर नियोजनबध्दतेने हिचा वापर केला. आपण विज्ञाननिष्ट माणसे मात्र या वनस्पतीच्या उपयोगाला पोरके झालो. निळी व पांढरी फूले येणारी असे दोन प्रकार यात दिसून येतात. उपचारात कधीच मागे न हटणारी, न हरणारी अशी ही उपयोगिता वनस्पती अपराजित आहे. म्हणून ‘अपराजिता ‘ असे दुसरे नांव या वनस्पतीला आहे. सर्दि, ताप,खोकला, दमा अशा विविध विकारांवर ही अत्यंत आणि खात्रीपुर्वक गुणकारी आहे. त्वचाविकार आणि रक्तशुध्दीकरण हे हिचे दोन महत्वाचे गुणधर्म आहेत. शरिरातील त्रिदोष संतूलीत करून शरिरातील नको असणारे घटक बाहेर काढणारी ही महत्वाची वनस्पती अनेक विकारावर रामबाण ठरली आहे.
इंग्रजीत या वनस्पतीला Clitoria ternatea ( क्लायटोरिया टर्नेशिया) म्हणून संबोधले जाते.या वनस्पतीची लागवड बियापासूनही केली जाते.
आपणा सर्वांस विनंती की अशी ही दिव्य औषधी आपल्या परसात किंवा कुंडीत जरुर लावून ठेवा.या व्यतिरिक्त तिच्यात असे अनेक औषधी गुणधर्म आहे की ते वाचून तुंम्ही थक्क व्हाल.
अशा या गोकर्णीत रक्त शुध्द करण्याची क्षमता असल्याने टॉनिक म्हणूून याचा सर्रास वापर करता येतो. गोकर्णीला शेंगा येतात. या शेंगाच्या बियांचे उगाळून आठदहा थेंब काही दिवस नाकात घातले तर अर्धडोकेदुखीपासून कायमची मुक्ती मिळते.याचे कानातही असे थेंब टाकल्यास कानदुखी थांबते.
या वनस्पतीच्या औषधी उपयोगाचा हा प्रपंच मोठा आहे. विशेष म्हणजे मेंदू संबंधी विकारात ही वनस्पती मैलाचा दगड ठरली आहे. या वनस्पतीच्या सेवनाने विसराळूपणावर मात करता येते. विषेशत: लहान मुलांना ही द्यावी. या वनस्पतीचे पान, फूल, खोड, बिया,मूळ असे सर्व भाग उपयेगात येतात. श्वसनासंबंधीचे आजार बरे करणारी ही महत्वाची वनस्पती आहे.गळ्याच्या विकारात महत्वाची ठरते.या झाडाच्या मुळीची पावडर, तुपात मिसळून घेतल्यास घसा दुखी बरा होतो.घशातील खवखव, आवंडा गिळताना होणारा त्रास कमी होतो. ही वनस्पती रक्तातील विशारी घटक बाहेर काढत असल्याने मानवी शरिराची नर्वस सिस्टिम सक्षम करण्यासाठी ही फार उपयोगाची आहे.अशा वेळी या वनस्पतीचा रस काढून तो ठराविक मात्रेत सेवन करावा.या वनस्पतीच्या पानांचा काढा करून घेतल्यास उलटी, मळमळ, जुलाब, गँस्ट्रो,ताप, थंडी अशा भयंकर आजारातून मुक्ती मिळते. पाने रोजच्या चहात टाकून प्याल्यास ह्रदयाचे व श्वसनासंबंधीचे सारे विकार दूर होण्यास मदत होते.नपुसंकतेवर ही वनस्पती प्रभावी आहे.ही शितल थंड असूनही स्त्री पु्रुषांची लैंगिक शक्ती वाढवण्यात महत्वाची ठरली आहे.याच्या मुळीची पावडर करून करून मधाबरोबर काही दिवस घेतल्यास ही लैॉगिक शक्ती निश्चीतच वाढते.आयुर्वेदात ही वनस्पती पंचकर्मासाठी वापरली जाते.मानवी शरिरात अनेक महिण्यापासून किंवा अनेक वर्षापासून जमा होत आलेले विष बाहेर काढून शरिरातील रक्तशुध्दी करून शरिर शुध्दीकरणाचे महत्वाचे काम ही वनस्पती करत असते.भारतासह आजूबाजूच्या देशात ही प्राधान्याने आढळते. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक लतावेलीबरोबर तरारून येणाऱ्या वनस्पतीत हीही वनस्पती असते.या वनस्पतीच्या मुळीचा लेप करून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो.त्वचेवरील विकार जातात तर डोळ्यांची मजबूती वाढते.
ही भारतीय वंशाची वेलवर्गिय सदाहरित वनस्पती आहे.या वनस्पतीचे फूल अत्यंत आकर्षक आहे.दुसऱ्याच्या आधाराने सरसर चढते.गच्चीत, बागेत अनेजन लावतात.या वनस्पतीने आजूबाजूचा परिसर विषमुक्त होतो.शुध्द व खेळती,सात्विक हवा प्रदान करणारी ही वनस्पती अनेक आजारी माणसांची तारणहार ठरली आहे.

सुभाष माने
भुदरगड, गारगोटी.
मो. ७७७००५७५४२

प्रतिक्रिया व्यक्त करा