You are currently viewing वेंगुर्ल्यात 8 मार्चला पाककला व नृत्य स्पर्धा

वेंगुर्ल्यात 8 मार्चला पाककला व नृत्य स्पर्धा

वेंगुर्ले तालुका भाजप महिला मोर्चातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोमवार दिनांक आठ मार्च रोजी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी शाकाहारी व मांसाहारी ( पारंपारिक पदार्थ ) पाककला स्पर्धा तसेच नृत्य स्पर्धा ‘सण’ या संकल्पनेवर घेतली जाणार आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता दामले व उपाध्यक्ष ऍड. सुषमा प्रमुख खानोलकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 5 =