ग्रामपंचायत कुशेवाडा लसीकरण मोहीम

ग्रामपंचायत कुशेवाडा लसीकरण मोहीम

वेंगुर्ला :

गावागावात सध्या लसीकरणाची मोहीम जोरदार राबवली जात आहे. परंतु लोकांच्या मनात सध्या लसीकरणाबाबत समज-गैरसमज भीती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज ३ जुलै रोजी ग्रामपंचायत कुशेवाडा च्या वतीने वय वर्ष १८ ते ४४ या गटातील ग्रामस्थांना Covishield ही लस उपलब्ध करून देण्यात आली. गावातील लोकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

यावेळी सरपंच सौ. स्नेहा राऊळ, उपसरपंच श्री. निलेश सामंत, आरोग्य सेवक श्री. बनसोडे, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा