You are currently viewing ….तर भाजपा कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांसह कोणाच्याही बेनामी निकृष्ट कामांचा बेधडक पर्दापाश करावा!

….तर भाजपा कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांसह कोणाच्याही बेनामी निकृष्ट कामांचा बेधडक पर्दापाश करावा!

विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस कधीही भ्रष्ट कामांना पाठीशी घालत नाहीत. त्यामुळे कोणाचीही फिकीर करायची गरज नाही!!

:भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांचा आक्रमक पावित्रा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधी एक दिवस अगोदर सिंधूदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत आणि त्याचे कंत्राटदार बंधू किरण सामंत यांनी रत्नागिरीत देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली असल्याच्या चर्चेची बातमी वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली आहे. आपल्या दोन्ही जिल्ह्यातील कामांना विरोध होऊ नये यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन आम्हाला सांभाळून घ्यावे अशी विनंती केली असल्याचे वृत्तपत्रातून काही शिवसैनिकांच्याच हवाल्याने प्रसिद्ध झाले आहे.

माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सूडबुद्धीने आजवर कोणाचीही योग्य पद्धतीने चाललेली कामे अडकवलेली नाहीत. जिथे चांगले होणार असेल तिथे नेहमीच सहकार्याची भूमिका घेतलेली आहे, हे थेट मातोश्री-२ पर्यंत सर्वजण चांगलेच जाणतात. असे असेल तर चाललेल्या कामाला विरोध होऊ नये म्हणून जर देवेन्द्रजींची भेट घेतली असेल तर या कामात नक्कीच गोलमाल आणि मनात चुकीचा हेतू धरून ही भेट असण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. परंतु देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या कारकिर्दीत आजवर कुठल्याही अयोग्य आणि भ्रष्टाचार चाललेल्या गोष्टींना थारा दिलेला नाही. त्यामुळे त्यांची भेट जर निकृष्ट दर्जाच्या कामांना विरोध होऊ नये म्हणून कोणी घेत असल्याची चर्चा शिवसैनिकांकरवी घडवत असेल, तर देवेंद्रजींच्या उज्वल आणि निष्कलंक प्रतिमेला जाणीवपूर्वक धक्का लावण्याचेच हे षडयंत्र असेल. भाजपा कार्यकर्त्यांनी याला भीक न घालता जिल्ह्यात चाललेल्या निकृष्ट कामांची पोलखोल चालवावी, मग ती ठेकेदारी कोणाचीही असो. पालकमंत्री किंवा शिवसेनेचा कोणताही आमदार-खासदार बेनामी ठेकेदारीतून निकृष्ट कामे जनतेच्या माथी मारणार असेल, तर ते सहन करायला हे कोणीही सिंधुदुर्ग भाजपाचे घरजावई लागत नाहीत हे कार्यकर्त्यांनी पक्के ध्यानात ठेवावे. जिथे जिथे निकृष्ट काम दिसेल तिथे त्याची पोलखोल करत क्वालिटी कंट्रोलकडून ऑडीट करून घ्यावे. आपली बांधीलकी सामान्य जनतेशी आहे, शिवसेनेसारखी ठेकेदारांशी नाही याचे सामाजिक भान ठेवावे. प्रत्येक तालुक्यातील निकृष्ट कामांची यादी तयार करून संबंधित ठेकेदारांविरोधात तक्रार करण्याचे अभियान भाजपा कार्यकर्त्यांनी सुरू करावे. या अभियानात भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्गाचे सर्व ज्येष्ठ नेते आणि भाजपाची सोशल मीडिया कार्यकर्त्यांसोबत नक्कीच उभी राहील, असा विश्वास सोशल मीडियाचे श्री अविनाश पराडकर यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + eleven =