You are currently viewing बांदा-आळवाडीतील उद्यान खुले करणे संदर्भात शिवसेने तर्फे ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन सादर

बांदा-आळवाडीतील उद्यान खुले करणे संदर्भात शिवसेने तर्फे ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन सादर

बांदा

शहरात आळवाडी येथे ग्रामपंचायतने लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच मनोरंजनासाठी उभारलेल्या उद्यानाची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था झाल्याने या उद्यानाची तात्काळ साफसफाई करून हे उद्यान मुलांसाठी खुले करावे अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर व युवा कार्यकर्ते अर्णव स्वार यांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामविस्तार अधिकारी सौ. लीला मोर्ये यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अर्णव स्वार, साईप्रसाद काणेकर, उदय येडवे, प्रथमेश गोवेकर, ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके, नागेश बांदेकर, मिलिंद सावंत, प्रियेश नाटेकर, निखिल मयेकर आदी उपस्थित होते.


निवेदनात म्हटले आहे की, उद्यानातील खेळणी ही गंजल्याने यामुळे मुलांना खेळताना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्यानात गवत वाढल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा देखील वावर वाढला आहे. एकंदरीत उद्यानाची दुरावस्था झाल्याने मुलांना खेळण्यासाठी धोकादायक बनले आहे. यासाठी तात्काळ याची दखल घेत उद्यानाची साफसफाई करून ते मुलांना खेळण्यासाठी खुले करावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 7 =