You are currently viewing राज्य सरकारची दडपशाही मोडण्यासाठी भाजपला आता रस्त्यावर उतरावे लागेल!

राज्य सरकारची दडपशाही मोडण्यासाठी भाजपला आता रस्त्यावर उतरावे लागेल!

पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत सिंधुदुर्ग भाजपा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा सरकारचा प्रकार निषेधार्हच!!

भाजपा सोशल मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांची संतप्त भावना

सध्या राज्य सरकारच्या विरोधात कोणी काहीही बोलले तर त्याला कायदेशीर नोटिसा दिल्या जात आहेत, अटक केली जात आहे. लोकशाहीत विरोधी पक्षाचा सत्य मत मांडण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मान्य नसलेले हे राज्य सरकार सुडाचे राजकारण करत आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. मागच्या काही कालावधीत राज्यभर अनेक भाजपा कार्यकर्त्यांवर विनाकारण खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आजच भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲडव्होकेट प्रदीप गावडेंना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
प्रदीप गावडेंनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान राखत अहिल्यादेवींची तुलना कोणासोबत करू नका अशी मागणी केली म्हणून त्यांना अटक केली का? प्रदीप गावडेंनी सर्जील उस्मानीच्या विरोधात तक्रार केली म्हणून त्यांना अटक केली का? प्रदीप गावडेंनी पवार साहेबांना साक्ष देण्यासाठी कायदेशीर आग्रह धरला म्हणून त्यांना अटक केली का? महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे का? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी भाजपाला या कोविडच्या काळातदेखील “सविनय कायदाभंग” करावा लागणार असेल, तर त्याला कोणी राजकारण समजू नये. कारण कोणताही कार्यकर्ता हाच संघटनेचा कणा असतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणुन अन्यायाविरोधात भूमिका मांडणाऱ्या विरोधी पक्षाचा संघटनात्मक कणा मोडण्याचे काम हे पराभूत मानसिकतेचे राज्य सरकार करत आहे, असा आरोप भाजपा महाराष्ट्र सोशल मीडियाचे अविनाश पराडकर यांनी केला आहे.

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपा सरचिटणीस  प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनाही वेंगुर्ला पोलिसांनी कायदा सुव्यवस्था बिघडल्यास कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस दिली आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दौ-याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडण्याजोगा प्रकार घडून, कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचे कृत्य घडून आल्यास, तसेच जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मनाई आदेश लागू केलेल्या आदेशाचा भंग होऊन, कोरोना संक्रमणाचा प्रसार होईल असे कोणतेही कृत्य घडल्यास आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा आशयाची नोटीस वेंगुर्ला पोलिस स्टेशनतर्फे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांना दिले आहे.

वेंगुर्ला पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांनी प्रसन्ना देसाई यांना दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, आपण सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायद रद्द केला. त्यामुळे मराठा समाजामध्ये खदखद आहे. यास भरीस भर म्हणून महाराष्ट्र राज्याचे पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीमध्ये मराठ्यांना सामावून घेणार नाही अशाप्रकारचे संतापजनक विधान केले आहे. त्याअनुषंगाने जो पर्यंत वडेट्टीवार मराठा समाजाची जाहीर मागत नाही तोपर्यंत त्यांना सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फिरु देणार नाही. वडेट्टीवार यांचा दौरा आम्ही होऊ देणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केले असल्याचे दिसू येत आहे. त्याअनुषंगाने आपणास समज देण्यात येते की, मंत्री विजय वडेट्टीवार यांचा हा शासकीय दौरा आहे. त्यामुळे या दौ-याच्या अनुषंगाने आपल्याकडून कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडण्याजोगा प्रकार घडल्यास आपल्यावर गुन्हा नोंद होईल.

कोविड परिस्थिती आहे हे भाजपालाही मान्य आहे. या परिस्थितीही प्रसन्ना देसाई यांच्यासारखे अनेक भाजपा पदाधिकारी जीव धोक्यात घालून कोविड योद्धा म्हणून आदर्शवत काम करत आहेत. कोणताही विषय अंगलट आला की शासकीय यंत्रणा वापरून तो दाबायचा अशा प्रकारचे लोकशाहीच्या तत्वाला बाधक काम सत्ताधारी बेमुर्वतपणे करत आहेत. तुम्ही सत्ताधारी आहात, प्रशासकीय यंत्रणा तुमच्या हातात आहे, तर मग आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भयावह स्थितीत सत्ताधाऱ्यांच्या दौऱ्याची नाटकं कशाला? तुमचा तुमच्याच प्रशासनावर विश्वास नाही की स्थानिक सत्ताधारी आमदार खासदार यांच्यावर नाही हे एकदा स्पष्ट करा आणि मग शासकीय अधिकाऱ्यांसह जनतेचा जीव धोक्यात घालणारे हे दौरे कशाला? त्यातही मंत्र्यांनी विवादास्पद वक्तृत्व करून जनतेच्या भावना दुखवायच्या आणि विरोधकांनी जनतेचे मत मांडले की पोलीस यंत्रणा वापरत त्यांच्यावर दबाब टाकायचा हा “रडीचा डाव” झाला. निकोप लोकशाहीत असे रडीचे डाव खेळू न देण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षाची असते. आज प्रसन्ना देसाई यांच्यापासून हे डाव खेळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाजपाने हे सरकारचे डाव वेळीच रस्त्यावर उतरून मोडून काढण्याची गरज आहे. म्हातारी मेल्याचे दुःख तर असतेच, पण काळ जास्त सोकावणे लोकशाहीला आणि भाजपालाही परवडणारे नाहीय, याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे, आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम राहण्यासाठी पक्ष योग्य भूमिका घेईल असा विश्वास अविनाश पराडकर यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + four =