You are currently viewing “कणकवली शहरातील हायवेच्या समस्या पंधरा दिवसात न सोडवल्यास दोन्ही बाजूचा महामार्ग बंद करु”

“कणकवली शहरातील हायवेच्या समस्या पंधरा दिवसात न सोडवल्यास दोन्ही बाजूचा महामार्ग बंद करु”

— संदेश पारकर यांचा महामार्ग प्राधिकरण व दिलीप बिल्डकॉनला ईशारा

कणकवली शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून कणकवली एसटी स्टँड समोरील उड्डाण पुलाखालून एसटी स्टॅन्डमधून बाहेर जाणाऱ्या व एसटी स्टॅन्डमध्ये येणाऱ्या एसटीसाठी उड्डाण पुलाखालून एकच मार्ग ठेवला असल्याने कणकवली शहरात वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे एसटी स्टँड मधून बाहेर जाणाऱ्या एसटीसाठी अजून एक मार्ग तयार करा. या करिता पुलाखाली केलेले बॅरिकेट काढण्यात यावे अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सलिम शेख आणि उपअभियंता श्री.मण्यार यांच्याकडे केली.


तसेच कणकवली शहरातील अंतर्गत रस्ते, हायवे लगतचे पथदिवे सुरू करावे, दोन्ही बाजूच्या सर्विस रोडचे ड्रेनेज खुले करावे, आरओडब्ल्यू मधील अतिक्रमणे त्वरित हटवावीत, उड्डाणपुल गळती दुर करावी, शहरातील महामार्ग लगतच्या विविध ठिकाणच्या रिक्षा स्टॅन्डसाठी कायमस्वरूपी जागा मिळावी आदी बऱ्याच समस्या व मागण्यांसाठी संदेश पारकर यांनी आक्रमक भूमिका घेतली.
कार्यकारी अभियंता सलिम शेख आणि उपअभियंता श्री.मण्यार यांनी पंधरा दिवसात या समस्या सोडवण्यात येतील असे आश्वासन श्री.पारकर यांना दिले. पंधरा दिवसात सर्व समस्या मार्गी न लावल्यास दोन्ही बाजूचा महामार्ग बंद करु असा ईशारा संदेश पारकर यांनी महामार्ग प्राधिकरण आणि दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला, दिलीप बिल्डकॉनचे कन्स्ट्रक्शन मॅनेजर समर सिंग, अभियंता अभिजीत पाटील, शहरातील नागरिक व रिक्षाचालक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा