You are currently viewing देवगडात रोटरी आणि मँगोसिटीच्या माध्यमातून आसन व्यवस्था

देवगडात रोटरी आणि मँगोसिटीच्या माध्यमातून आसन व्यवस्था

देवगडात रोटरी आणि मँगोसिटीच्या माध्यमातून आसन व्यवस्था

देवगड

येथील रोटरी क्लब आणि मॅगोसिटी देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड येथील सार्वजनिक ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. यात शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांना त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे देवगडकरांच्यावतीने या अनोख्या उपक्रमाचे कौतूक होत आहे.

यावेळी रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगडचे रोटरी प्रेसिडेंट प्रविण पोकळे, चार्टर्ड प्रेसिडेन्ट हनिफशेठ मेमन, दयानंद पाटील, अनुश्री पारकर, मनिषा डांबरी, नरेश डांबरी, अनिल कोरगावकर, गौरव पारकर, विजय बांदिवडेकर,अनिल गांधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा