You are currently viewing आणखी दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये

आणखी दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये

सिंधुदुर्गनगरी

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात मंगळवार दिनांक 18 मे 2021 रोजी ताशी 65 – 75 ते 85 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. या कालावधीत समुद्र खबळलेला राहणार असल्याने या कालावधीत नागरिकांनीही समुद्रात किंवा समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

                अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिनांक 16 मे 2021 रोजी सकाळी 8 वा. पासून ते  17 मे 2021 रोजी सकाळी 8 पर्यंत 218 पुर्णांक 5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच 16 तारखेला जिल्ह्यात ताशी 80 ते 90 कि.मी. वेगाने वारे वाहत होते. अतिवृष्टी व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, विद्युत तारा व विद्युत पोल पडणे अशा घटना घडलेल्या आहेत. मात्र सदर स्थिती पुर्ववत आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.

                दि. 16 मे 2021 रोजी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडून रस्ता बंद झाला होता. सदर झाडे उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून बाजूला काढू रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात वादळामुळे खंडित झालेला वीज पुरवठा महावितरणमार्फत काल रात्रीच सुरू करण्यात आला आहे.

                महावितरणच्या एकूण 447 उच्चदाब वाहिन्या वादळामुळे पडलेल्या होत्या. तसेच 812 लघु दाब वाहिन्यांचा परवठा वादळामुळे बंद पडलेला होता. कोविड रुग्णांसाठी कार्यरत असणाऱ्या 6 डीसीएच पैकी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग मिळूण एकूण 5 डीसीएचचा, वादळामुळे बंद पडलेला, विद्युत पुरवठा महावितरण मार्फत सुरू करण्यात आलेला आहे. तसेच कोविड रुग्णांसाठी कार्यरत असणाऱ्या 8 डीसीएचसी पैकी 2 डीसीएचसी चा वादळामुळे बंद झालेला विद्युत पुरवठा महावितरण मार्फत सुरू करण्यात आला आहे. ज्या कोविड रुग्णालयांचा वीज पुरवठा अजून सुरू झालेला नाही त्यांचा विद्युत पुरवठा प्राधान्याने सुरू  करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी महावितरणला दिल्या आहेत. जिल्ह्यात चक्रीवादळामुळे एकूण 31 विद्युत उपकेंद्रांचा विद्युत पुरवठा बंद होता. त्यापैकी 19 उपकेंद्र दुरुस्त करून विद्युत पुरवठा आज 5.00 वाजेपर्यंत सुरू करण्यात आला आहे. इतर ठिकाणी खंडित झालेला वीज पुरवठाही अतिरिक्त मनुष्यबळ वापरून लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न महावितरण कडून करण्यात येत आहेत.

                चक्रीवादळामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडून रस्ते बंद झाले होते. त्यामध्ये सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागातील 13 रस्त्यांवर झाडे पडून रस्ते बंद झाले होते. हे सर्व रस्ते झाडे बाजूला करून वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. तसेच कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागातील 15 रस्त्यांवरही झाडे पडली होती. हे रस्तेही वाहतुकीसाठी पुर्ववत झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोविड रुग्णांकरिता आवश्यक असलेला ऑक्सिजनच्या वाहतुकीत कोणताही खंड न पडता चक्रीवादळाच्या काळातही व्यवस्थित सुरू राहीला. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील 40 रस्त्यांवर झाडे पडली होती. हे रस्तेही आता वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. नगरपालिका क्षेत्रातील 84 रस्ते झाडे पडल्यामुळे वाहतुकीस बंद झाले होते. त्यापैकी 69 रस्त्यांवरील वाहतुक सुरू झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 3 =