You are currently viewing खरेदी विक्री संघामध्ये साठवणूक केलेल्या भाताची २० मे  पर्यंत उचल  करा – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

खरेदी विक्री संघामध्ये साठवणूक केलेल्या भाताची २० मे पर्यंत उचल करा – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

*ओरोस येथे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, आ. दिपक केसरकर, आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न*

ओरोस :

सिंधुदुर्ग जिल्हयातील शेतकरी खरेदी विक्री संघाच्या गोडाऊन मध्ये साठवणूक करण्यात आलेल्या भाताची  उचल २० मे  पर्यंत कुडाळ येथील  बजाज राईस मिल मार्फत करण्याची  सूचना  जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

 

आधारभूत खरेदी किंमत योजना पणन  हंगाम २०२१-२२ संदर्भात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली व माजी पालकमंत्री आ. दिपक केसरकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख  उपस्थितीत ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.

यावर्षी सिंधुदुर्गात उच्चांकी भात  खरेदी झाली आहे.  जिल्हयातील शेतकरी खरेदी विक्री संघाच्या गोडाऊन मध्ये या भाताची साठवणूक करण्यात आली आहे. भाताची लवकरात लवकर उचल करावी  अशी मागणी होत होती. आज याबाबत झालेल्या बैठकीत बजाज राईस मिल मार्फत २० मे  पर्यंत भाताची  उचल करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून  देण्यात आल्या आहेत.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते, सहा.  जिल्हा पुरवठा अधिकारी दीप्ती धालावलकर, नायब तहसीलदार संजय गवस, जिल्हा मार्केटिंग अधिकारी नामदेव गवळी, बजाज राईस मिलचे संदीप चव्हाण, यतीन मयेकर,  कणकवली तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष विठ्ठल देसाई, गणेश तावडे, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =