राज्यात 21 सप्टेंबर नव्हे तर दिवाळीनंतरच शाळा सुरू होणार; शिक्षणमंत्र्यांनी केले स्पष्ट

राज्यात 21 सप्टेंबर नव्हे तर दिवाळीनंतरच शाळा सुरू होणार; शिक्षणमंत्र्यांनी केले स्पष्ट

वृत्तसेवा
केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्था चालक महामंडळाची बैठक घेतली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास साफ नकार दिला असून याबाबत आता दिवाळीनंतरच निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात २१ सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरु करण्याबाबत केंद्राने नुकतेच निर्देश दिले. त्याबाबतची एसओपीही(स्टण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जाहीर करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा