You are currently viewing शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत कासार्डे ज्यु. काॅलेचा मुलांचा संघ अजिंक्य

शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत कासार्डे ज्यु. काॅलेचा मुलांचा संघ अजिंक्य

कासार्डे विद्यालयाच्या दोन संघांना उपविजेतापद तर एक संघ तृतीय

 

कासार्डे :

 

जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खेळाडूंनी अभिनंदन यश संपादन केले असून ज्यु. कॉलेज मुलांच्या संघाने १९ वर्षाखालील गटात खेळताने जिल्ह्यात अजिंक्य ठरला आहे. याशिवाय १४ वर्षे खालील मुले व १९ वर्षाखालील मुलींचा संघानेही उपविजेते पदापर्यंत धडक मारले आहे. तर १४ वर्षाखालील मुलींचे संघानेही या स्पर्धेत आपले उत्कृष्ट कसब दाखवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

कासार्डे विद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या आट्यापाट्या स्पर्धेतील गुणांकन तक्त्यात सहभागी सर्व संघामधून सर्वाधिक गुण घेऊन कासार्डे विद्यालय या स्पर्धेत अव्वल ठरले.या स्पर्धेला जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस मॅडम व क्रीडा अधिकारी मनिषा पाटील मॅडम यांनी उपस्थित राहून विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कासार्डे विद्यालयाच्या

*१९ वर्षाखालील मुलांच्या संघात* -: सोहम सावंत, अनिकेत गुरव, आदेश घाडी, कैलास गुरव, तन्मय कदम, तुषार घाडी, प्रतीक मटकर, प्रतीक नारकर, भावेश सावंत, सर्वेश तेली, सुशील पाताडे, व अजिबा गवाणकर या खेळाडूंचा समावेश आहे.

*उपविजेता १४ वर्षाखालील मुलांच्या गटात -:* आर्यन काळे, गौरेश शिंदे, तेजस आईर, परशुराम राठोड, प्रथमेश पवार, अभिषेक आडे, अथर्व पारकर, मनोज जाधव, शुभम पाताडे, संकल्प भोगले, व सुमित राठोड या खेळाडूंचा समावेश आहे.

*१९ वर्षाखालील मुलींच्या संघात -:* कु. करीना डामरे, कांचन सावंत, गायत्री कोळी, तन्वी रांबाडे, तृप्ती शेट्ये, पूर्वा धुरी, श्रावणी मांजरेकर, संध्या पटकरे, सलोनी मेलगडे सुप्रिया पांचाळ, अक्षता कोयेकर व दीक्षा जठार या खेळाडूंचा समावेश आहे.

*तर १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने :* तृतीय क्रमांक पटकावला या संघात -कु.भार्गवी खानविलकर, अपूर्वा शेलार, काजल चव्हाण, जान्हवी रामण, दीक्षा सुथार, नंदिनी चव्हाण, नेहा पन्हाळकर, मयुरी दळवी, लक्ष्मी पवार, संजना चव्हाण व कु.सृष्टी कोलते आदी खेळाडूंचा समावेश आहे.

या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, अनिल जमदाडे, दिवाकर पवार, विनायक पाताडे, सौ.पुजा पाताडे, यशवंत परब, ऋषिकेश खटावकर आदी शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी खेळाडुंचे कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर व सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर व सर्व पदाधिकारी, शिक्षण समितीचे चेअरमन अरविंद कुडतरकर व सर्व पदाधिकारी, प्राचार्य एम.डी.खाड्ये, पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या यशस्वी संघांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.