You are currently viewing पुस्तकाचे मनोगत…

पुस्तकाचे मनोगत…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*पुस्तकाचे मनोगत….*

 

कॅालेजच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला

नि पुस्तकांचे अख्खे जग माझ्या हातात आले

जणू ! लायब्ररीत जाऊन स्लीप भरली व चार

पुस्तकांपैकी दोन पुस्तके आवडीची मिळाली.

त्यात एक होते ययाती!खांडेकरांना ज्ञानपीठ

मिळवून देणारी कादंबरी “ययाती..”

 

खूप दिवसांपासून “ययाती”वाचण्याची इच्छा

होती. हाती घेताच मी पूर्ण त्या पात्रांमध्ये बुडून

गेले. झपाटून गेले की, दुसरा काही विचारच

मनाला शिवेना. झोपेतही एक एक पात्र माझ्या

शी बोलू लागले. देवयानी मीच, शर्मिष्ठा मीच!

त्यांची सुखदु:ख्खे माझीच झाली जणू गारूड

केले त्यांनी माझ्यावर..

 

अशाच झपाटल्या अवस्थेत रात्री संभ्रमावस्थेत

कुणी तरी कानाशी हितगुज करू लागले.बघ

सुमती, बघ .. अजून तरी तुझ्या मनाचा ताबा

असा कुणी घेतला नव्हता खरे ना? मी म्हणाले,

होय, खरे आहे तुझे म्हणणे..बा पुस्तका.. तू तर

माझी तहानभूकच हरवून टाकलीस रे.. केवढे

सामर्थ्य आहे तुझ्यात! अग, तेच तर सांगतोय ना तुला मी.आज पर्यंत जे जे विद्वान होऊन गेले

व जे आता ही आहेत ते लाडाने अंगाखांद्यावर

आभुषणे म्हणून मला मिरवतात. तू बाबा साहेब

आंबेडकरांचा पुतळा पाहिलास का?अगं, मोठ्या गर्वाने मला त्यांनी अंगाशी धरले आहे,

आईने लेकरू कवटाळावे तसे! मी तर त्यांचे खरे आभुषण आहे.माझी खरी किंमत त्यांनाच

कळली होती ग? रात्री चिमणीच्या प्रकाशात

उपाशी तपाशी त्यांनी माझीच पारायणे केली.

१८/१८ तास मला समोर घेऊन ते बसले. जणू मला कोळून पीत होते ते! केवढा हुशार माणूस

होता ग..! माझी पाठ कधी सोडलीच नाही त्यांनी.

 

खायला पैसे नव्हते, पण पुस्तकांची कधी कमी

केली नाही.अर्धपोटी राहून इंग्लंड मध्ये शिकले.घरी अगदी तुटपुंजे पैसे पाठवत पण त्या माऊलीने कधी तक्रार केली नाही.अर्धपोटी

राहून दिवस काढले तिने ही! केवढी ही आत्मियता माझ्या विषयी.कारण मीच जगाचा

तारणहार आहे हे बाबा साहेबांना चांगले कळले होते. मला वाचून वाचून त्यांनी माझीच प्रचंड निर्मिती केली.काय लिहिले नाही त्यांनी? असे म्हणण्या इतपत प्रचंड ग्रंथ संपदा आहे त्यांची.आजवरचा जगाचा इतिहास हेच

सांगतो, ज्यांनी वाचले ते वाचले.तरले. यातून

ज्ञानेश्वर तुकाराम रामदास नामदेवही सुटले

नाहीत. ज्ञानेश्वरांनी गीतेचा अभ्यास केला. व ती सर्वसामांन्यांच्या पचनी पडेल अशी

“अमृतानुभवाच्या”रूपाने त्यांनी जनमानसात

घरघरात पोहोचवली व गीतेत काय रहस्य

आहे हे सर्व सामान्य जनांना कळले. हे पोहोचवणारा मीच ना?मी जन्मलो नव्हतो तेव्हा लोकांना ज्ञान मुखोद्गत करावे लागे व मग एका पिढीकडून ते दुसरीकडे जाऊ लागले.

पण जेव्हा पासून मला छापण्याची कला अवगत झाली तेव्हा पासून ज्ञानाचा जणू स्फोट

झाला म्हणशिल तरी चालेल.

 

अरिस्टॅाटल, प्लुटो,गॅलिलिओ, कोपर्निकस, व्हिन्सी,

न्यूटन यांनी तर फारच क्रांती केली.माझ्या मार्फत त्यांनी जी ज्ञान निर्मिती केली त्यामुळे

समाजात प्रचंड स्फोट झाला. समाज हादरला.

माझ्यासहित लेखकांनाही जाळण्यात आले.छळ झाला त्यांचा. पण ते जराही डगमगले नाहीत. त्यांनी लिहिलेल्या नव्या पुस्तकांनी ते बळी गेले पण त्यांनी माघार घेतली नाही इतका मी ज्ञानाचा पक्का आहे.

आणि माझ्या मुळे एका पिढी कडून पुढच्या

पिढीकडे ज्ञानाचा प्रसार अनेक शतके अव्याहतपणे सुरू आहे.नवनवे शोध लागतात,

त्यांचा प्रचार व प्रसार माझ्या मुळेच झाला ना

आता पर्यंत?

 

अजूनही माझी निर्मिती प्रचंड प्रमाणात होते व होत राहिल कारण हा ज्ञानाचा खजिना मी शतकानुशतके जपून ठेवतो व पुढच्या पिढीला

सुपुर्त करतो. म्हणूनच ग्रंथालयात मला जतन केले जाते. शेकडो वाचक ग्रंथालयात बसून मला घरी आणून माझ्यात तास न् तास बुडून

जातात.तू सुध्दा एका बैठकीत च मला किती तरी वेळा वाचले आहे, खरे ना?तू तर मला वेड्यासारखे वाचले आहेस? मराठीतले त्यावेळचे सारेच लेखक तू वाचलेस नि समृद्ध

झालीस व तू ही आता माझी निर्मिती करू लागली हे पाहून मी किती खुश आहे हे तुला कसे सांगू?

 

आजकाल तंत्रज्ञानाचा प्रचंड स्फोट झाला असून मोबाईलने सारे जग व्यापून टाकले आहे

हे खरे असले तरी माझी निर्मिती थांबली आहे काय? मुळीच नाही. नविन पिढी वाचत नाही खरे आहे.पण ते ही केव्हातरी शहाणे होतीलच

व माझे महत्व त्यांना पटेल हे निश्चित! हे नविन

खेळणे ते किती दिवस खेळतील? केव्हातरी

डोळे उघडतीलच ना?

 

माझे महत्व, कुणी वाचो न वाचो कधीच कमी

होणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण आई नंतर मीच तुमचा गुरू आहे. आणि

गुरू कधी अडगळीत जाऊ शकतो का? त्यामुळे आज पर्यंत होतो तसाच मी सदैव तुमच्या पाठीशी आहे हे लक्षात ठेव. तुला मी

किती प्रिय आहे हे कुणी सांगण्याची गरज नाही. तू माझा हात कधी ही सोडणार नाही हे ही मला माहित आहे. खूप बोललो बाई ! कंटाळली नाहीस ना? येतो आता, झोप जरा

निवांत.

 

मनातल्या या विचारांनी मला खडबडून जाग

आली व पुस्तकाच्या बोलण्याचे कौतुकही वाटले.

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =