You are currently viewing मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

आई

म्हटलं एकदा..
आई होऊन पहावं,
बापाची जबाबदारी..
आईची कामं,
एकाच पारड्यात तोलावं.
बाप बापच असतो,
जबाबदारी वाहत जगतो.
दोन वेळच्या घासासाठी,
दिवस-रात्र राबतो.
बापाचे कष्ट सर्वांनाच दिसतात.
त्यावर आता..
आणखी काय बोलावं.
म्हटलं एकदा..
आई होऊन पहावं.

आईचा दिवस मात्र,
काळोखातच सुरू होतो.
न्हाणी घरात आग घालून,
पहाटेच आंघोळी करणे.
लहान थोर सर्वांचीच,
आंघोळीची सोय करणे.
केरकचरा, साफसफाई,
विहिरीवरून पाणी उदीक,
हे तर सर्व सोपंच वाटावं,
म्हणून म्हटलं एकदा…
आई होऊन पहावं.

देवघरातील देव पूजेची,
सकाळच्या चहा नाश्त्याची,
तयारीही तिनेच करावी.
नवऱ्याचा,मुलांचा डबा,
वेळेवर बनवून देणं.
कपडे धुणीभांडी करताना,
स्वतःच्या खाण्याचंही,
तिला भानच नसावं.
म्हणून म्हटलं एकदा…
आई होऊन पहावं.

दुपारचं जेवण सांजचा चहा,
रात्री सुद्धा तेच रडगाणे,
एकदा स्वतः करून पहा.
सगळी झोपली तरी,
आई माजघरात वावरते.
उद्यासाठीची तयारी ती,
आजच करून ठेवते.
असंच एकदा घरात वावरवं,
म्हणून म्हटलं एकदा,
आई होऊन पहावं.

जमिनीला पाठ टेकली तरी,
चिंता सकाळी उठण्याची.
कण्हत कुरबुरत डोळे मिटते,
उसंत एक झोप लागण्याची.
कोंबड्याची बांग होते,
लगबग सुरू आईच्या कामाची.
हेच जिणं आईचं
कधीतरी जगून घ्यावं.
म्हणून म्हटलं एकदा….
आई होऊन पहावं..!!

(दिपी)✒️
दीपक पटेकर.
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 4 =