You are currently viewing द्रोणकाव्य

द्रोणकाव्य

अंतरीचा देव

संकटाच्या वेळी जो
उभा राहतो तो
आधारवड
खरा देव
त्यातची
जाणा
रे

पाषाणावर ठेवा
श्रद्धा तुम्ही फार
अंधविश्वास
मनातून
नसावा
कधी
रे

मनाच्या गाभाऱ्यात
ईश्वर वसतो
मन प्रसन्न
ठेवताची
देवही
भेटे
रे

सुख ते माणसाच्या
विचारात असे
विचार शुद्ध
नसे द्वेष
अंतरी
तृत्पी
रे

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − three =