You are currently viewing जोधा अकबर मधील किल्ल्याचा सेट आगीच्या भक्ष्यस्थानी…

जोधा अकबर मधील किल्ल्याचा सेट आगीच्या भक्ष्यस्थानी…

दिग्दर्शक नितीन देसाई च्या एनडी स्टुडिओमध्ये अग्नी कल्लोळ

प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत रस्त्यावर असलेल्या एनडी स्टुडिओमध्ये जोधा अकबर सेट जवळील फायबर मुर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे आज दुपारी १२ ते १२.१५ च्या सुमारास भीषण आग लागली आहे. शनिवार वाड्याचा सेटही जळाला असल्याची माहिती येत आहे.

आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजले नाही. खालापूर तालुक्यातील हातणोली-चौक येथील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओत आज दुपारी आग लागली आहे.

जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

आज दुपारी बारा ते सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. ही आग प्रचंड असून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोळ या परिसरात पहायला मिळत आहेत. एनडी स्टुडिओतील जोधा अकबर सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली आहे.

घटनास्थळी खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार, पोलीस निरीक्षक विभूते व संबंधित यंत्रणा दाखल झाले असून, फायर ब्रिगेडच्या 3 गाड्या बोलाविल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या आगीत स्टुडिओचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समजलेले नाही. दरम्यान, काेराेनामुळे सध्या एनडी स्टुडिओमध्ये चित्रकरण बंद हाेते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − four =