You are currently viewing सावंतवाडीत पुंडलिक दळवींच्या वाढदिवसानिमित्त ४१ रिक्षाचालकांना पेट्रोलचे वाटप…

सावंतवाडीत पुंडलिक दळवींच्या वाढदिवसानिमित्त ४१ रिक्षाचालकांना पेट्रोलचे वाटप…

सावंतवाडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरातील ४१ रिक्षाचालकांना पेट्रोलचे वाटप करण्यात आले. यावेळी संबंधित रिक्षाचालकांना प्रत्येकी १०० रुपयांचे पेट्रोल मोफत देऊन मदतीचा हात देण्यात आला.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, हिदायतुल्ला खान, इफ्तिकार राजगुरू, दर्शना बाबर-देसाई, राजू धारपवार, प्रसाद दळवी, सुरेश वडार, संतोष जोईल, अशोक पवार आदी उपस्थित होते.
श्री.दळवी यांच्या ४१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ४१ रिक्षाचालकांना मोफत पेट्रोल वाटप हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी लाभार्थी रिक्षाचालकांनी श्री.दळवी यांचे आभार मानून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा