ऑनलाइन क्लास घेणा-या शाळांनी फी कमी करावी..

ऑनलाइन क्लास घेणा-या शाळांनी फी कमी करावी..

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

कोरोनाच्या प्रकोपामुळे  गेल्या वर्षभरापासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे शिकविले जात आहे. तरीही देशभरातील शाळांकडून दरवर्षीप्रमाणे पूर्ण फी  आकारली जात आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने या शाळांना फी कमी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने सांगितेले की, कोरोना संकटामुळे लोकांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, याची शैक्षणिक संस्थांनी जाणीव ठेवावी. तसेच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दिलासा द्यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा