कणकवली तालुका बंदला सहकार्य….

कणकवली तालुका बंदला सहकार्य….

फोंडाघाट गावात उत्स्फूर्त “जनता कर्फ्यू” ! बाजारपेठ कडकडीत बंद

कणकवली

सभापती मनोज रावराणे यांच्या आवाहनाला अनुसरून फोंडाघाट ग्रामपंचायतीने कणकवली तालुक्याच्या जनता कर्फ्यू च्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारी, व्यापारी- अधिकारी- ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये व्यापाऱ्यांच्या विनंतीस मान देऊन सोमवार तारीख ३ मे पासून पुढील सोमवार १० मे पर्यंत फोंडाघाट बाजारपेठ व गांव बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. रविवारी सर्वत्र अनौंसमेंटही केली. त्याप्रमाणे आजपासून दवाखाने, बँका, मेडिकल, बांधकामे, रेशन-धान्य दुकान वगळता सर्व व्यवसाय,दुकाने इत्यादी सर्व फोंडावासियांनी बंद ठेवून सहकार्य केले.

फोंडाघाट चेकपोस्टवर पोलीस आणि आरोग्य पथक कार्यरत असून येणाऱ्या गाड्यांचे ई-पास तपासले जात असून नोंद ठेवताना कोरोना सदृश्य लक्षणाची तपासणी केली जात आहे. मात्र चेकपोस्ट च्या मागून परजिल्ह्यात जाण्याचे अनेक मार्ग असल्याने चेकपोस्टवर ची कारवाई व तपासणी केवळ जिल्ह्यासाठी फार्स ठरत असल्याची खंत ग्रामस्थ करताना दिसतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही बाब ग्रामस्थांनी, स्थानिक आमदार, पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

फोंडाघाट कधी नव्हे ते कोरोना बाधित होत असताना तसेच रुग्ण सापडत असताना सर्वांनी आपल्यासह, आपल्या गावाची काळजी घेणे आणि त्यासाठी ठरवल्याप्रमाणे प्रामाणिक राहणे,शिस्त पाळणे गरजेचे आहे. त्याकरिता गाव- व्यवसाय बंद ठेवून घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. आज पहिला दिवस, कडेकोट पाळल्या नंतर पुढील ७ दिवस “जनता कर्फ्यू” कसा पाळतात यावरच गोssकोरोनाचे निर्मूलन अवलंबून आहे. मात्र नागरिकांना रिकामा वेळ जास्त असल्याने सुरक्षित अंतर ठेवताना, अवैध दारूविक्री, अवैध धंदे, अवैध भाजीपाला विक्री याचा प्रादुर्भाव गावात, वाडी- वाडीवर होणार नाही,याकडे ग्रामसुरक्षा कमिटीने निर्बंध ठेवणे व चुकीचे आढळल्यास परावृत्त करणे, अत्यंत आवश्यक आहे. अशी अपेक्षा जनता व इतर व्यापार्‍यांमधून व्यक्त होत आहे अन्यथा प्रामाणिक व्यावसायिकांवर अन्याय होण्याची शक्यता जास्त आहे..त्यातच जि.प.च्या बांधकाम विभागाने पेठेतील रस्त्याचे शिल्लक राहीलेला डांबरीकरणाच्या थराचे काम निर्विघ्नपणे उरकुन घेतले…

प्रतिक्रिया व्यक्त करा