You are currently viewing नवरात्रोत्सव कालावधीत गरबा दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये – पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे

नवरात्रोत्सव कालावधीत गरबा दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये – पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे

सिंधुदुर्गनगरी 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदाचा नवरात्रोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे नवरात्र उत्सव कालावधीत गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केले आहे.

      सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरात्र उत्सव मंडळांचे अध्यक्ष व सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे प्रमुख  सहायक पोलीस निरीक्षक एस.पी पवार, वाहतुक नियत्रंण शाखेचे प्रमुख श्री. व्हटकर, नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

       पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे पुढे म्हणाले, दिनांक 17 ते 25 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत जिल्ह्यामध्ये नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. त्याअनुषंगाने गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत आरोग्य शिबीरे, आरोग्य विषयक जाहिराती प्रदर्शित कराव्यात. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे असे सांगून श्री. दाभाडे पुढे म्हणाले, सार्वजनिक मंडळानी ध्वनी प्रदुषण नियम व तरतुदीचे पालन करावे. देवीचे दर्शन ऑनलाईन होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत. उत्सवादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मंडळाचे पदाधिकारी यांनीही सामाजिक अंतर पाळावे. तसेच येणाऱ्या भाविकांनाही सामाजिक अंतर पाळणे,  मास्क लावणे याबाबत सूचित करावे. मंडळांनी मुर्तीच्या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सॅनिटायझर व साबण पाणी आदींची व्यवस्था करावी.

       यावेळी पोलीस अधीक्षक श्री. दाभाडे यांनी नवरात्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देवून जिल्हावासियांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − five =