वीजपुरवठा सोमवार ऐवजी शनिवार अथवा रविवारी या दोनपैकी एका दिवशी बंद ठेवण्यात यावा….

वीजपुरवठा सोमवार ऐवजी शनिवार अथवा रविवारी या दोनपैकी एका दिवशी बंद ठेवण्यात यावा….

विलास साळसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

देवगड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मार्फत नियमित आठवड्यातील सोमवार या दिवशी दुरुस्ती व डागडुज्जीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. साधारणतः सकाळी नऊ ते पाच या कालावधीत बहुतांशी सोमवारी हा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी शासकीय व अशासकीय काम करता येणाऱ्या नागरिकांची वीज पुरवठा बंद अभावी गैरसोय होते व नियोजित कामे रेंगाळतात.
प्रसंगी आठवड्याचा पहिला दिवस असूनही सर्व कार्यालयांमध्ये अधिकारी कार्यालया समोर कोणत्याही प्रकारे कामांना चालना दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांची अपूर्ण अवस्थेत असलेली कामे विलंबाने होतात. शासनाने पाच दिवसाचा आठवडा केल्यानंतर सोमवार ते शुक्रवार हे नियमित कामकाजाचे दिवस म्हणून सर्व कार्यालय उघडी असतात. शनिवार रविवार या दोन दिवशी सुट्टी असल्याने शासकीय कार्यालयातील कर्मचारी आठवडा सुट्टीनंतर सोमवारी कार्यालयात दाखल झाल्यानंतर वीजपुरवठा बंद असल्याने कार्यालयीन कामकाजाचा सोमवारच्या पहिला दिवस पूर्णपणे वाया जातो व कामे ठप्प होतात.
त्यामुळे म.रा.वि.वि कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे आपणा मार्फत आवश्यक त्या सूचना करून दुरुस्ती व डागडुजी करता बंद ठेवण्यात येणारा वीजपुरवठा सोमवार ऐवजी शनिवार अथवा रविवारी या दोनपैकी एका दिवशी बंद ठेवण्यात यावा व त्यादिवशी दुरुस्तीची कामे प्राधान्याने करून घ्यावेत, अशी सूचना संबंधितांना देण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा तालुकाप्रमुख विलास साळसकर व देवगड तालुका प्रमुख मिलिंद साटम यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा