टीडीएस जमा करणे आणि टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ ३१ मेपर्यंत..

टीडीएस जमा करणे आणि टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ ३१ मेपर्यंत..

देशभरातील करदात्यांकडून, कर सल्लागार आणि इतर भागधारकांकडून मिळालेल्या विनंत्या लक्षात घेता ही मुदतवाढ…

 

आयकर विभागाने कोरोना काळात करदात्यांना दिलासा देताना अनेक कामांची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतलाय. मोदी सरकारने मूल्यांकन वर्ष २०२०-२१ ची अंतिम मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपलेली असताना ती ३१ मे २०२१ पर्यंत वाढविली.  शनिवारी सरकारने करदात्यांना दिलासा देत टीडीएस जमा करणे आणि टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ दिलीय. करदात्यांकडून यात दिलासा मिळावा, असे निवेदन मिळाले होते, त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) म्हटलेय.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या या आदेशानुसार, आयकर कायदा १९६१ च्या कलम १३९ च्या सेक्शन ४ आणि ५ अंतर्गत रिटर्न आणि सुधारित परतावा भरण्याची तारीख दोन महिन्यांसाठी वाढवून ३१ मे २०२१ करण्यात आली. यापूर्वी ही अंतिम तारीख ३१ मार्च २०२१ रोजी समाप्त झाली होती.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली प्रतिकूल परिस्थिती आणि देशभरातील करदात्यांकडून, कर सल्लागार आणि इतर भागधारकांकडून मिळालेल्या विनंत्या लक्षात घेता ही मुदतवाढ देण्यात आल्याचंही मोदी सरकारनं स्पष्ट केलंय.

कमिश्नर अपीलकडे अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ एप्रिल २०२१ पर्यंत होती, जी ३१ मे पर्यंत वाढविण्यात आली. कलम १४४ सी अन्वये तंटा निवारण पॅनेलसाठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख १ एप्रिलपर्यंत होती, ती ३१ मेपर्यंत वाढविण्यात आली. कलम १४८ अन्वये नोटिसा मिळाल्यास रिटर्न भरण्याची अंतिम मुदतही ३१ मे पर्यंत वाढविण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा