You are currently viewing आजपासून १८ वर्षावरील कोरोना लसीकरणासाठी या वेबसाईटवर नोंदणी करा

आजपासून १८ वर्षावरील कोरोना लसीकरणासाठी या वेबसाईटवर नोंदणी करा

कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान १८ वर्षांवरील सर्व लोकांना १ मे पासून लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असून, यासाठी नोंदणी २८ एप्रिल म्हणजेच आज 4 वाजल्यापासून नवी नोंदणी सुरू होत आहे. या नव्या यंत्रणेसंदर्भात केंद्र सरकारने नवीन धोरण तयार केलेय. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुणांना नोंदणी न करता ही लस मिळू शकणार नाही. नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आलेय.

http://www.cowin.gov.in किंवा आरोग्य सेतू पोर्टलवरून किंवा अॅप डाउनलोड करून लसीकरणासाठी स्व:त नोंदणी करता येणार आहे. एका मोबाइल क्रमांकावरून चार लाभार्थ्यांची नोंदणी करता येणार आहे. ‘ओटीपी व्हेरिफिकेशन’ नंतर लाभार्थ्याचे कोविन अकाउंट उघडण्यात येणार असून, त्यावर नाव, जन्माचे वर्ष, लिंग आदी तपशील भरावा लागणार आहे. या प्रक्रियेदरम्यान जवळचे सरकारी किंवा खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्र, तारीख व वेळ निवडता येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी स्लिपची प्रिंट काढता येणार आहे; तसेच लाभार्थ्यांच्या मोबाइलवर मेसेज देण्यात येणार आहे.

कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणे करून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =