माड्याचीवाडीतील तरुणाची आत्महत्या..!

माड्याचीवाडीतील तरुणाची आत्महत्या..!

कुडाळ

तालुक्यातील माड्याचीवाडी रायगाव येथील तरुणाने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. याबाबत ची खबर पोलीस पाटील चंद्रशेखर परब यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली.

रायगाव माड्याचीवाडी येथील तरुण संदेश सदानंद परब-धामापूरकर याने आपल्या राहत्या घरातील आतील खोलीत टॉवेल व बेल्टच्या साहाय्याने लाकडाला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी ५ वाजता घरातील माणसांच्या लक्षात आल्यानंतर पोलीस पाटील यांना कळवले. त्यानंतर पोलीसात खबर देण्यात आली.

घटनास्थळी निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक संकेत पगडे, पोलीस हेडकाँस्टेबल नितीन शेडगे, पोलीस सुहास पाटकर, दीपक गावडे उपस्थित होते. कुडाळ येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पश्चात आई , वडील, दोन भाऊ, भावजया, पुतणी असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा