You are currently viewing देवगड पंचायत समितीच्या १६ जागांसाठी आरक्षण जाहीर…

देवगड पंचायत समितीच्या १६ जागांसाठी आरक्षण जाहीर…

शिरगाव मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी; दाभोळे व पुरळ नामाप्र महिलांसाठी आरक्षित…

देवगड

येथील पंचायत समितीच्या १६ जागांसाठी आज आरक्षण फक्त जाहीर झाली. यात शिरगाव पंचायत समितीचा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित करण्यात आला. तर दाभोळ व पुरळ मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली.

या सोडतीत देवगड तालुक्यातील भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षाच्या दिगग्ज नेत्यांना धक्का बसला आहे. यात भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य, शिवसेना तालुकाप्रमुख यांना आणखी पाच वर्षे उमेदवारीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आरक्षण सोडत शालेय विद्यार्थिनी चैतन्या तुषार पांचाळ हिच्या हस्ते काढण्यात आली ती पुढीलप्रमाणे

अनुसूचित जाती महिला -शिरगाव प.स.गण(३२)

नामप्र महिला – पुरळ,प.स.गण (२६) दाभोळे(३५)-प.स.गण

नामाप्र प्रवर्ग – नाडण,प.स.गण(३३) पडेल,प.स.गण(२७)

सर्वसाधारण महिला -कुवळे,प.स.गण(३८) महाळुंगे, प.स.गण(३१),विजयदुर्ग प.स.गण(२५), बापर्डे प.स.गण(२८), मोंड,प.स.(३४)

सर्वसाधारण ,प्रवर्ग – पोंभुर्ले,प.स.गण(२९) गोवळ,प.स.गण(३०) कुणकेश्वर,प.स.गण(३६) किंजवडे,प.स.गण(३७) मिठबाव प.स.गण(२९), मुणगे प.स.गण(४०) याप्रमाणे आहे.

राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उदासीनता या वेळी दिसून आली .यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम काँग्रेस तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, माजी सभापती रवींद्र जोगल, माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, माजी पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य वर्षा पवार व अन्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 8 =