आता मूक मोर्चे नाहीच….. संघर्ष अटळ आहे….!

आता मूक मोर्चे नाहीच….. संघर्ष अटळ आहे….!

नितेश राणे यांचा सरकारला इशारा.

मराठा समाजाला भाजपा सरकारच्या काळात मिळालेले आरक्षण स्थगित झाल्यामुळे भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकार विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सरकारने मराठ्यांचा विश्वासघात केला !! आज आमच्या समाजाचे भविष्य अंधारात गेले, कुठल्या तोंडाने या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्यायचं आणि कशासाठी….? आता मूक मोर्चा नाहीच….. आता संघर्ष अटळ आहे !! अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्विटर द्वारे राज्य सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांना लक्ष्य केले आहे.कुठल्या तोंडाने या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्यायचं आणि कशासाठी…? असा जाबही विचारला आहे.त्यामुळे येत्या काळात मराठा समाज आपल्या हक्कासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा