You are currently viewing जि.प.च्या योजनांचा ग्रामीण भागातील महिलांनी लाभ घ्यावा; संजना सावंत

जि.प.च्या योजनांचा ग्रामीण भागातील महिलांनी लाभ घ्यावा; संजना सावंत

जि.प.वाढीव उपक्रव्यतिरिक्त 90 टक्के अनुदानातून महिला सबली करणासाठी 14 लाभार्थीना कोंबडी पिल्लांचे वाटप!

कणकवली

जि.प. सिंधुदुर्ग तर्फे जि.प. वाढीव उपकराव्यतीरीक्त अनुदानातून 90 % अनुदानावर महिला सबलिकरणाकरीता 1 दिवसाची 50 कुक्कुट पिल्ले वाटप या योजनेतून कणकवली तालुक्या अंतर्गत एकूण 70 मंजूर लाभार्थिपैकी 14 लाभार्थिना पं.स कणकवली येथे जि.प अध्यक्षा संजना सावंत, सभापती मनोज रावराणे यांच्या उपस्थितीत पिल्लांचे वाटप करण्यात आले.

यावेळी मिलींद मेस्त्री, पं.स सदस्य, डॉ.शिंपी,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ.चौधुले, डॉ.वेर्लेकर, पशुधन विकास अधिकारी व अन्य पशुधन पर्यवेक्षक उपस्थित होते.

यावेळी या जि.प च्या योजनेचा ग्रामिण भागातील महीलांनी याचा लाभ घेवून आपली आर्थिक उन्नती साधवी व अर्थाजन करावे व आपल्या कुटुंबाला हातभार लावावा.तसेच महीला सक्षमीकरण व्हावे याच हेतूने ही जि.प.ने योजना राबविल्याचे अध्यक्षा संजना सावंत यांनी सांगीतले.

सभापती रावराणे म्हणाले, ज्या लाभार्थीना या योजनोचा लाभ मिळाला आहे. त्यांनी याचे योग्य प्रकारे नियोजन करून यातून आपल्या संसाराला हातभार लावावा. या योजनेतून सदर पिल्लांसाठी खादयही मोफत असल्याने लाभार्थिनी कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. त्यांनी घरच्याघरी योग्य नियोजन करून त्यांना वाढवावे व आपले अर्थकारण करावे व समाजापूढे एक आदर्श उभा करावा असे आवाहन सभापती मनोज रावराणे यांनी केले.

या योजनेतून कणकवली तालुकयातील वागदे, कनेडी, नांदगांव, तरळे या ठिकाणच्या पंचक्रोषीतील अन्य लाभार्थिंनाही पशुसंवर्धन विभागामार्फत त्या – त्या ठिकाणी जावून पिल्लांचे वाटप करणेत आले. याप्रसंगी प्रस्तावना डॉ.चौघुले तर आभार डॉ.शिंपी यांनी मानले

यावेळी उपथीत लाभार्थि पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करत सोशल डीस्टंसींग व मास्क या सर्वाचा वापर करून लाभार्थिना पिल्लांचे वाटप सकाळच्या सत्रात करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + fourteen =