सांगुळवाडी येथील कोवीड केअर सेंटरला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट

सांगुळवाडी येथील कोवीड केअर सेंटरला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेकडून घेतला आढावा

वैभववाडी
कोरोनाचा हाॕटस्पाॕट ठरलेल्या दिगशी व सांगुळवाडी येथील कोविड सेंटरला जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी भेट दिली. त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या.
यावेळी पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, वैभववाडी तहसिलदार रामदास झळके, पोलिस निरीक्षक अतुल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डाॕ.अनिल पवार, डाॕ.सोनावने आदी उपस्थितीत होते.

वैभववाडी तालुक्यात गेले काही दिवस कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वैभववाडी तालुक्यातील रुग्णांसाठी सांगुळवाडी येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आले असून जिल्हाधिकारी यांनी या कोविड सेंटरला भेट देऊन येथील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. येथील रुग्णांना दिले जात असलेले उपचार व जेवन याबाबत माहीती घेतली. त्यानंतर त्यांनी कोरोनाचा हाॕटस्पाॕट ठरलेल्या दिगशी गावाला भेट देऊन येथील सध्यस्थितीचा आढावा घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा