महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्ह्याभरात अभिवादन

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्ह्याभरात अभिवादन

उदगीरात राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले अभिवादन…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उदगीर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी अभिवादन केले. तळवेस येथील सांस्कृतिक सभागृहाजवळ पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या हस्ते करण्यात आले. नालंदा बौद्ध विहार, रेल्वे स्टेशन येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, रिपाइं जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, बाजार समिती सभापती सिद्धेश्वर पाटील, काँग्रेसेच तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, पोलीस उपअधीक्षक डॅनियल जाॅनबेन, पोलीस निरीक्षक गोरख दिवे, मुख्याधिकारी भारत राठोड, उपाध्यक्ष सुधीर भोसले, माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे,

नगरसेवक श्रीरंग कांबळे, ताहेर हुसेन, पप्पू गायकवाड, दिलीप कांबळे, शिवसेनेचे श्रीमंत सोनाळे आदी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे सचिव ॲड. प्रफुल्लकुमार उदगीरकर, सहसचिव शशीकांत बनसोडे, कार्याध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, उपाध्यक्ष दयानंद शिंदे, कोषाध्यक्ष अविनाश गायकवाड, नरसिंग शिंदे, मदन तुळजापुरे, सुधीर घोरपडे, पिंटू सुतार, संजय तुळजापुरे, रावसाहेब भालेराव, राहुल कांबळे आदींनी पुढाकार घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा