You are currently viewing बांदा नट वाचनालय आयाेजीत निबंध स्पर्धेला प्रतिसाद….

बांदा नट वाचनालय आयाेजीत निबंध स्पर्धेला प्रतिसाद….

बांदा

बांदा नट वाचनालय आयाेजीत अंकुश रामचंद्र माजगावकर व परीवार पुरस्कृत कै. परशुराम लाडु नाईक व कै.लश्मीबाई परशुराम नाईक यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे उदघाटन अंकुश माजगावकर यांच्या हस्ते कै परशुराम व कै. लश्मी नाईक यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून व मान्यवराच्या हस्ते दिपप्रज्वलीत करुन करण्यात आले. या कार्यक्रमाला मान्यवर म्हणुन जिल्हा परीषद केंद्र शाळा क्र. १ च्या मुख्याधिपाका सराेज नाईक, वाचनालयाचे उपाध्यष सुभाष नार्वेकर, सहसचिव हेमंत माेर्ये, जगन्नाथ साताेसकर, संचालीका स्वप्निता सावंत, गुरुनाथ नार्वेकर, आदी मान्यवर उपस्थित हाेते.

कार्यक्रमाची सुरुवात सुभाष माेर्ये यांच्या प्रास्तावीक भाषणाने झाली. ते म्हणाले, या स्पर्धेचे हे चाैथ वर्ष असुन अंकुश माजगावकर यांच्या सारखी दानशुर व समाजाला प्रेरणा देण्याऱ्या व्यक्तीमुळे या स्पर्धा वाचनालय घेवु शकत. या अशा स्पर्धामुळे मुलामधील सुप्त गुणाना वाव मिळ असे सांगितले. मुख्याध्यापीका सराेज नाईक यानी या स्पर्धेत सहभागी विद्यार्थाना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी ग्रंथपाल प्रमिला माेरजकर, नाईक, सुनिल नातु, अमिता परब यांनी विशेष परिश्रम घेतले, कार्यक्रमास पालक शिशक वर्ग मोठ्या संख्येने पस्थित हाेता. कार्यक्रमाच्या शेवटी आभार वाचनालयाचे सचिव राकेश केसरकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =