You are currently viewing कॉलेजरोडवरील विचित्र रिक्षा अपघातात रिक्षासह चार दुचाकीचे मोठे नुकसान

कॉलेजरोडवरील विचित्र रिक्षा अपघातात रिक्षासह चार दुचाकीचे मोठे नुकसान

*कॉलेजरोडवरील विचित्र रिक्षा अपघातात रिक्षासह चार दुचाकीचे मोठे नुकसान*

सावंतवाडी

सावंतवाडी, कॉलेजरोड येथील तीन आसनी रिक्षा अपघातात रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवलेल्या चार दुचाकी गाड्यांसह रिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे. सदरची रिक्षा सावंतवाडी बाजारपेठेतून माजगाव येथे परत जात असताना हा अपघात झाल्याचे समजते आहे. अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले, सुदैवाने समोर कोणी नसल्याने मनुष्यहानी टळली.
माजगाव येथील रिक्षा मालक सुरेश पेडणेकर हे सावंतवाडी बाजारपेठेतून माजगावच्या दिशेने परत जात असताना त्यांचा रिक्षावरील ताबा सुटल्याने (MH07- A 1779) कॉलेजरोड येथे रस्त्याच्या विरुध्द बाजूला उभ्या करून ठेवलेल्या चार दुचाकींना ठोकरून रिक्षा सुनील पेडणेकर यांच्या वडापावच्या गाड्यावर जाऊन आदळली. अपघातग्रस्त रिक्षाची धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकी जवळपास दहा फूट लांब जाऊन पडल्या तर एक दुचाकी रिक्षाच्या मडगार्ड मध्येच अडकली होती. चारही दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून सावंतवाडी पोलीसांनी तात्काळ दाखल होत पंचनामा केला. या दुचाकींमध्ये माजगाव येथील आवेलीन फर्नांडिस यांच्या टीव्हीएस स्टार सिटी व नारायण गावडे यांची डिओ या गाड्यासह एका एव्हीटर गाडीचे सर्व पॅनल, हॅण्डल तुटले असून टिव्हीएस ज्युपिटर गाडीचे किरकोळ नुकसान झाले. सुनील पेडणेकर यांच्या वडापाव गाड्याचे देखील किरकोळ नुकसान झाले.
रिक्षा चालक सुरेश पेडणेकर यांना सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून रक्तदाब कमी होऊन चक्कर आल्याने अपघात झाल्याची माहिती त्यांना रुग्णालयात दाखल करणारे माजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.सावंत यांनी दिली.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =