7 व्या आर्थिक गणनेचे काम सुरु…

सिंधुदुर्गनगरी :

केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणीअंतर्गत राष्ट्रव्यापी 7 वी आर्थिक गणना करण्यात येत आहे. या गणनेमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी अ.आ.कुलकर्णी यांनी दिली.
या 7 व्या आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्याकडून नेमण्यात आलेल्यया प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याकडून केले जात आहे. कोविड-19 मुळे लागू करण्यात आलेल्या लॉगडाऊन काळात जिल्ह्यातील आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम थांबविण्यात आले होते. तथापि सदर गणनेचे काम पुन्हा सुरु करण्यात येत आहे. तरी या 7 व्या आर्थिक गणनेला जिल्ह्यातील नागरिकांनी, व्यापारी व्यवसायिक व उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =