You are currently viewing सावंतवाडीत घराच्या खिडकीत सुद्धा पोचलेत राखी धनेश पक्षी…

सावंतवाडीत घराच्या खिडकीत सुद्धा पोचलेत राखी धनेश पक्षी…

सावंतवाडीच्या निसर्ग सौन्दर्यामुळे दुर्मिळ प्राणी पक्ष्यांचे होतेय सावंतवाडीत वास्तव्य…..

♦️भारतीय राखी धनेश….(इंडियन ग्रे हॉर्नबिल) जोडीने दिसणारा हा पक्षी शक्यतो उंच झाडांवर दिसून येतो. शहरांमध्ये राहणाऱ्या मोजक्याच धनेश प्रजातींमध्ये राखी धनेशचा समावेश होतो. नर धनेशचे टोप हे मादीच्या तुलनेत स्पष्ट दिसणारे असते आणि चोच जास्त गडद रंगाची असते. नर मादी मधील फरक ओळखणे त्यामुळे सोपे होते.

♦️राखी धनेशचा आवाज हा घारीच्या आवाजाशी मिळताजुळता आहे. इतर प्रजातींच्या धनेश पक्ष्यांप्रमाणे उडताना राखी धनेशच्या पंखांचाही फर्रर फर्रर आवाज येतो. झाडीच्या ढोलींमध्ये मादीला अडकवून ठेवण्याचं धनेश पक्षाचं कसब वाखाण्याजोगं आहे. धनेश पक्षी हा मुख्यतः फलहारी आहे, त्यामुळे फळं लागण्याच्या हंगामात बऱ्याचवेळा तो शहरात उंच झाडांवर आढळतो. त्याची लांब चोच आणि शेपटी यामुळे तो विशेष आकर्षक दिसतो. त्याच्या आवाजही ऐकण्यात एक वेगळा आनंद मिळतो.

♦️अलीकडेच सावंतवाडी शहरात नगरसेवक अॅड. परिमल नाईक यांच्या घराच्या खिडकीत नित्यनेमाने येऊन हा धनेश आपल्या भारदस्त आवाजात ओरडत असतो. माणसांचीही भीती न उरल्यामुळे तर आपण घरापर्यंत आलो आहे असं तर त्याला सांगायचं नाही ना?

♦️सावंतवाडी शहरात दिसणारे असे विविध पक्षी, तलावात अचानक आलेली पाणमांजरे यामुळे प्राणी आणि पक्षी प्रेमींसाठी सावंतवाडी हे भविष्यात एक प्रेक्षणीय स्थळ नक्कीच होऊ शकेल. अनेक प्राणी आणि पक्षी मित्र सावंतवाडीकडे आकर्षित झाले तर नक्कीच नवल वाटणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 1 =