You are currently viewing वेत्ये, इन्सुली येथील काळ्या दगडाच्या खाणी अपघातास निमंत्रण.

वेत्ये, इन्सुली येथील काळ्या दगडाच्या खाणी अपघातास निमंत्रण.

इन्सुली सर्कल राणे यांना लोकप्रतिनिधींनी विचारला जाब

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या वेत्ये व इन्सुली गावातील काळ्या दगडांच्या खाणी मधून होणारी ओव्हरलोड वाहतूक ही राष्ट्रीय महामार्गावरूनच होत असल्याने काळ्या दगडाच्या खाणी वरून येणाऱ्या मातीच्या रस्त्यावरील चिखल हायवेवर येतो, त्याचप्रमाणे गाड्या ओव्हरलोड असल्याने गाडीतून देखील माती रस्त्यावर पडते, त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर चिखल झाल्याने हा चिखल निश्चितच अपघातास निमंत्रण देणारा आहे.


इन्सुली येथील सरपंचांसहित इतर लोकप्रतिनिधींनी सदर काळ्या दगडाच्या खाणीतून होणारी ओव्हरलोड वाहतूक रोखून धरत इन्सुली सर्कल श्री.राणे यांना पाचारण करण्यात आले. इन्सुलीच्या लोकप्रतिनिधींनी सर्कल श्री.राणे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला व ओव्हरलोड असलेल्या गाड्यांवर, काळ्या दगडाच्या खाण मालकांवर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु सर्कल श्री.राणे यांनी उडवाउडवीची उत्तरे देत, हा भाग आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगून इन्सुली येथील लोकप्रतिनिधींनाच इन्सुली गावाची हद्द दाखविण्याचा हास्यास्पद प्रकार केला. सदरचा भाग आपल्याकडे येत नाही आणि ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करण्याचे आपले अधिकार नाहीत, ते आरटीओ चे अधिकार असल्याचे सांगितले. यावर इन्सुली येथील लोकप्रतिनिधींनी भरलेल्या डंपरचे पास तपासण्यास सांगितले असता सर्कल श्री.राणे यांनी असमर्थता दर्शविली.
इन्सुली येथील लोकप्रतिनिधींनी सर्कल श्री.राणे यांच्यावर सदरच्या खाण मालकांकडून पैसे मिळत असल्याने अधिकारी कारवाई करण्यात येत नाहीत. पोलिसांना कळविले असता पोलीस देखील दुर्लक्ष करतात असे आरोप केले. सकाळीच रस्त्यावर आलेल्या चिखलात एक महिला पडली होती परंतु सुदैवाने तिला काही दुखापत झाली नाही असे सांगत महसूल अधिकाऱ्यांचे काळ्या दगडाचे उत्खनन करणाऱ्या खाण मालकांचे आणि महसूल अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई होत नाही त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर सदर खाणीवरून येणाऱ्या ओव्हरलोड डंपर मधील माती पडून अपघात होण्याची शक्यता असल्याने अपघात घडल्यास महसूल अधिकारी जबाबदार असतील असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा